गोंदिया,दि.0७ : विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर चारही मतदारसंघातून आता ७१ उमेदवार रिगंणात आहे. मात्र यात सुध्दा सर्वच पक्षातील बंडखोर उमेदवारांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे.आज सोमवारी कोण माघार घेणार आणि कोण कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. यानंतरच निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.गोंदियातून भाजपचे विनोद अग्रवाल,तिरोड्यात राष्ट्रवादीचे दिलीप बनसोड,काँग्रेसचे नामदेव किरसान,आमगावात काँग्रेसचे रामरतन राऊत,नामदेव किरसान तर अर्जुनी मोरगावमध्ये राजेश नंदागवळी,रत्नदीप दहिवले,निशांत राऊत यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केल्याने यांच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.यापैकी कोण रिंगणातून माघार घेतो त्यावरच समीकरण बनणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात सध्या नकली व असली भाजप असा प्रचार केला जात आहे.परंतु जे असली नकलीचा प्रचार करीत बसले ते मात्र 2014 मध्ये गोंदियात येऊन येथील उमेदवारांना डावलून रिंगणात राहणारे,2014 मध्येच आमगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला डावलून बसपमधून आलेल्या पुरांमाना भाजपची तिकिट देणारी भाजप तर अपक्ष नगरसेवक म्हणून राजकारणात येणारे नंतर काँग्रेसचे नगरसेवक होत भाजपात जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांचा विचार केल्यास असली व नकली भाजपवाले कोन हा एक प्रश्न पुन्हा चर्चेला आलेला आहे.त्यातच आजच्या उमेदवाराला नकली म्हणणारे जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होऊन मात्र सत्तेचा मलिंदा आणि ठेकेदारीचा लाभ घेतांना ही गोष्ट विसरल्यासारखे झाले होते की काय अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.राजकारणात पक्षबदल हा नवा नियम नाही.लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीही अनेक नेते भाजपात आले मग त्यांच्याबद्दल काय अशा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ७६ उमेदवारांनी १२२ नामाकंन दाखल केले होते. मात्र छाननी दरम्यान काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्याने तर काहींच्या अर्जात त्रृट्या असल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत. आज सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यानंतर चिन्हाचे वाटप होऊन निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येणार आहे.सोमवारी या चारही मतदारसंघातील पक्षातून बंडखोरी करणारे उमेदवार आपले अर्ज मागे घेतात की ते त्यांच्या भूमिकेवर कायम राहतात, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे अपक्ष उमेदवार सोमवारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आणि राजकीय पक्षांचे सुध्दा लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून एकूण पाच उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर ७१ उमेदवार रिगंणार आहेत. यात सर्वाधिक २५ उमेदवार गोंदिया विधानसभा मतदारसंघात असून त्यापाठोपाठ अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २०, तिरोडा १६ आणि आमगाव मतदारसंघातून सर्वात कमी १६ उमेदवार रिंगणात आहेत.प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळसर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शनिवारपासूनच प्रचाराचा नारळ फोडत मतदारसंघात सभा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्या पक्षाचे नेते सुध्दा कामाला लागल्याचे चित्र आहे.




