30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून ४४ उमेदवार निवडणूक लढविणार-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून ४४ उमेदवार निवडणूक लढविणार-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
52
  • १६ जणांचे उमेदवारी अर्ज मागे
  • रिसोडमध्ये सर्वाधिक १६ उमेदवार रिंगणात

वाशिम, दि. ०७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १६ जणांचे अर्ज मागे घेण्यात आल्याने आता ४४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यामध्ये ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघातून १६, ३४-वाशिम विधानसभा मतदारसंघातून १३ आणि ३५- कारंजा विधानसभा मतदारसंघातून १५ उमेदवारांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, रिसोड विधानसभा मतदारसंघातून ०९, वाशिम विधानसभा मतदारसंघातून ०३ आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून ०४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. रिसोड मतदारसंघात सर्वाधिक १६ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने याठिकाणी दोन बॅलेट युनिट (बीयु)ची आवश्यकता भासणार आहे. उर्वरित दोन्ही मतदारसंघांमध्ये एकाच बॅलेट युनिटवर मतदान घेतले जाणार आहे. सर्व मतदारसंघांसाठी यापूर्वीच मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. रिसोड मतदारसंघासाठी लागणाऱ्या अतिरिक्त बॅलेट युनिट जिल्ह्यात उपलब्ध आहेत. लवकरच मतदान यंत्रांची पूरक सरमिसळ प्रक्रिया राबवून त्यापैकी आवश्यक बॅलेट युनिटचे वितरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १०५२ मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किमान आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात १ आदर्श मतदान केंद्र व २ सखी मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्ह्यातील १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेब कास्टिंग होणार आहे, तसेच ७० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमले जाणार आहेत. मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध उपक्रम राबवीत आहे. या निवडणुकीत दिव्यांगांचे १०० टक्के मतदान होईल, यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी सांगितले. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी ते म्हणाले.

  वाशिम जिल्ह्यातील निवडणूक लढविणारे उमेदवार (पक्ष) व चिन्ह 

३३- रिसोड विधानसभा मतदारसंघ :अमित सुभाषराव झनक (इंडियन नॅशनल काँग्रेस) – हातशे. खाजा शे. फरीद (बहुजन समाज पार्टी)- हत्तीविजयकुमार वामनराव उल्हामाले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)- रेल्वे इंजिनसानप विश्वनाथ आश्रुजी (शिवसेना)- धनुष्यबाणदत्तराव भिकाजी धांडे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन) – पतंगदिलीप रामभाऊ जाधव (वंचित बहुजन आघाडी) -गॅस सिलेंडरडॉ. प्रशांत गावंडे पाटील (संभाजी ब्रिगेड पार्टी)- शिवण यंत्रराजेश श्रीकृष्ण अंभोरे (बहुजन विकास आघाडी)- शिट्टी, अनिल रंगराव घुगे (अपक्ष)- हेलिकॉप्टरअनंतराव विठ्ठलराव देशमुख (अपक्ष) – चावीचेतन वामनराव इंगळे (अपक्ष) – स्पॅनरतसव्वरखॉ गुलाम गौसखॉ (अपक्ष) – बॅटप्रशांत विष्णू बकाल (अपक्ष) – कप आणि बशीडॉ. राजीव नंदकिशोर अग्रवाल (अपक्ष) – ऑटो रिक्शाडॉ. राधाकिसन मधुकरराव क्षीरसागर (अपक्ष) – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरीविश्वनाथ तुकाराम शेवाळे (अपक्ष) – कपाट.

३४- वाशिम (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ : दिलीप पांडुरंग भोजराज (बहुजन समाज पार्टी) –    हत्तीडॉ. भारत लक्ष्मण नांदुरे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) – कणीस आणि विळासौ. रजनी महादेव राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) – हातलखन सहदेव मलिक (भारतीय जनता पार्टी) – कमळमहादा आश्रु हिवाळे (विदर्भ माझा पार्टी)- दूरदर्शनराहुल जयकुमार बलखंडे (संभाजी ब्रिगेड पार्टी) – शिवण यंत्रसिद्धार्थ आकारामजी देवळे (वंचित बहुजन आघाडी) – गॅस सिलेंडरसौरभ रवींद्र गायकवाड (बहुजन मुक्ती पार्टी)- खाटसंतोष बन्सी कोडीसंगत (प्रहार जनशक्ती पार्टी)- कप आणि बशीपेंढारकर शशिकांत यशवंतराव (अपक्ष)- अंगठीभागवत सखाराम रणबावळे (अपक्ष) – कॅमेराभालेराव दीपक रमेश (अपक्ष) -ऑटो रिक्शासचिन वामनराव पट्टेबहाद्दूर (अपक्ष)- शिट्टी.

३५- कारंजा विधानसभा मतदारसंघ : डहाके प्रकाश उत्तमराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)- घड्याळपाटणी राजेंद्र सुखानंद (भारतीय जनता पार्टी) – कमळमो. युसुफ मो. शफी पुंजानी (बहुजन समाज पार्टी) – हत्तीडॉ. सुभाष पांडुरंग राठोड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) – रेल्वे इंजिनआदेश रामभाऊ गवई (बहुजन मुक्ती पार्टी)– खाटकरीम सत्तार शेख (राष्ट्रीय ओलमा कौंसिल)- शिट्टीपुरुषोत्तम नागोजी ठोंबे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मीस्ट))- बॅटमनीष दामोदर मोडक (प्रहर जनशक्ती पक्ष)- कपबशीमाणिक महादेवराव पावडे (संभाजी ब्रिगेड पार्टी) – शिवण यंत्रमुरलीधर लालसिंग पवार (विकास इंडिया पार्टी) – बॅटरी टॉर्चडॉ. राम शेषराव चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) – गॅस सिलेंडरकॉ. रामकृष्ण पुंडलिकराव सावके (सी. पी. आय. (एम.एल.) रेडस्टार)- ट्रॅक्टर चालविणारा शेतकरीअण्णासाहेब उत्तम रोडगे (अपक्ष)- दूरदर्शनदिगंबर नरेंद्र चव्हाण (अपक्ष)- जहाजविनोद पंजाबराव नंदागवळी (अपक्ष)- स्पॅनर.