25.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ दिव्यांग मतदार बांधवांची जनजागृती रॅली 

दिव्यांग मतदार बांधवांची जनजागृती रॅली 

0
27

 गोंदिया दि.12 : जिल्हयात येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत जिल्हयातील सर्व दिव्यांग मतदार बांधवांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रमाअंतर्गत 11 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील आठही तालुक्यात दिव्यांग मतदार बांधवांच्या रॅलीचे व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते..जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील ४७५१ दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.जिल्ह्यातील दिव्यांग मतदार बांधवांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमाचे (दि.११) आयोजन करण्यात आले होते. दरम्यान स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथे जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आहे. इंदिरा गांधी स्टेडियम ते जयस्तंभ चौक, गांधी चौक, मुख्य बाजार मार्गे रॅली इंदिरा गांधी स्टेडियम येथे परत पोचली.  अर्जुनी मोरगाव येथे उपविभागीय अधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाळे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.या रॅलीत 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते,त्यात 150 विद्यार्थी हे दिव्यांग होते.यावेळी तहसिलदार विनोद मेश्राम,नायब तहसिलदार भानाकर,गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे,शिक्षण विस्तार अधिकारी बरईकर,अनुप भावे यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.