गडचिरोली, दि.13 : जेप्रा येथे विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत ग्राम पंचायत जेप्रा येथे नोडल अधिकारी तथा गट विकास अधिकारी, विधानसभा क्षेत्र – 68 यांनी गावाला भेट देऊन मतदान विषयी मार्गदर्शन केले.यावेळी श्रीमती मरसकोल्हे गटविकास अधिकारी पं.स गडचिरोली, श्री. ठाकरे, ग्रामसेवक, जेप्रा महिला वर्ग, ग्रामपरिवर्तक तसेच ग्राम परिवर्तक अश्विनी जेट्टीवार, ग्रामपंचायत जेप्रा, गडचिरोली
दि.12/10/2019 रोजी सांस्कृतीक भवन जेप्रा येथे श्रीमती सुनिता मरसकोल्हे गट विकास अधिकारी यांनी महिलांची सभा घेऊन मतदानविषयी जनजागृती केली तसेच मार्गदर्शन केले. यामध्ये EVM +VVPAT मशिन कशी चालवायची हे सांगितले. यावेळी आम्ही 100% मतदान करणार ही शपथ घेण्यात आली. तसेच यांच्या उपस्थिती मध्ये बाल हक्क कायदा 2006, बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व मतदान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती गडचिरोली, ग्रामपंचायत जेप्रा, MVSTF यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी करीता प्रयत्न केले.




