गोंदिया,दि.21 – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज राज्यात(दि.21) मतदानाला सुरवात झाली.गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठी सुध्दा आजच मतदान होत असून या निवडणुकीतील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्नी वर्षा पटेलसह गोंदियातील नमाद महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.त्यासोबतच जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी सुध्दा आपपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे.पटेलांनी यावेळी बोलतांना विधानसभा निवडणुकीतील मतदारांचा कौलबघता राज्यात परिवर्तन होणार असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे म्हणाले. गेल्या ५ वर्षात भाजप सरकारने काहीही विकास केला नाही. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले होते. मात्र, भाजपने विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे प्रफुल्ल पटेलांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सपत्नीक मतदान केले.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी महावीर मारवाडी शाळेतील मतदान केंद्रावर व अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी हिंदी टाऊन शाळेच्या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदाने केले.काँग्रेसचे उमेदवार अमर वराडे यांनी नमाद महाविद्यालय मतदान केंद्रवर तर युवा स्वाभीमानचे उमेदवार जितेश राणे यांनी रांगेत मतदारासाेबत लागून मतदान केले.जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी फुलचूर येथील 317 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान केले.
देवरी : कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस आणी मित्रपक्षाचे आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे उमेद्वार सहषराम कोरोटे यांनी आज सोमवार (दि.21) रोजी देवरी येथील बुथ क्रं 214 मध्ये आपल्या कुटूंबासह सकाळी 7.00 वाजता सर्वप्रथम मतदान करूण आपला मतदानाचा हक्क बजावला.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम यांनी आपल्या पुराडा यागावी सप्तनीक मतदानाचा हक्क बजावला.अर्जुनी मोरगावः-अर्जूनी/माेरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनाेहर चंद्रीकापूरे यांनी बाम्हनी/सावंगीच्या केंद्रावर सपत्नीक मतदान केले.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस रिपाई महाआघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांनी हिरडामाली येथील मतदान केंद्रावर सप्तनीक मतदानाचा हक्क बजावला.तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार विजय रहागंडाले यांनी चिखली येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.अपक्ष उमेदवार दिलीप बनसोड यांनी ठाणेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.तिरोड्याच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी सहकुटुब तिरोडा येथे तर गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गोरेगाव येथे,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी हिरडामाली येथील मतदान केंद्रावर तर माजी आमदार खोमेश रहागंडाले यांनी तुमखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.




