27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ ‘रन फॉर युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड चे...

‘रन फॉर युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड चे 31ऑक्टोबर रोजी आयोजन

0
25

गडचिरोली,दि.30(जिमाका) : सरदार वल्लभभाई पटेल यांचा  दि.31 ऑक्टोबर हा जन्म दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने या दिवशी (31 ऑक्टोबर) सकाळी  6.30 वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय दौडमध्ये युवक-युवती,विद्यार्थी,खेळाडू,योगप्रेमी, स्वयंसेवी संस्था,पोलीस,व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सुभास गांगरेड्डीवार, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.

ही दौड सकाळी 6.30 वाजता “एकता दौड” चे आयोजन पोलीस स्टेशन, गडचिरोली ते कारगील चौक या दरम्यान करण्यात येणार आहे.यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, तसेच गडचिरोली शहरातील युवा मंडळ,क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचा सहभाग असणार आहे.तरी नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी, तरूण तरूणींनी  मोठया संख्येने या राष्ट्रीय एकता दौड मध्ये तसेच या दिवशी जिल्हाभरातील आयोजित कार्यक्रमांस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.