25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ धानपिकाची नुकसान भरपाई द्यावी-राष्ट्रवादीचे निवेदन

धानपिकाची नुकसान भरपाई द्यावी-राष्ट्रवादीचे निवेदन

0
30

तिरोडा,दि.31ः- तिरोडा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या दिवाळीसणाच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेला धान आणि दमट वातावरणामुळे पिकाला लागलेल्या किडरोगाने धानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने त्वरीत या नुकसान झालेल्या धानपिकाचे पंचनामे करुन भरपाई देण्यात यावे यामागणीचे निवेदन आज(दि.31)तिरोडा तहसिलदारामार्फेत शासनाकडे पाठविले आहे.निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, जि.प. सदस्य कैलाश पटले, मनोज डोंगरे, उपसभापति मनोहर राऊत,प्रभुदास पटले माजीसभापती, राजु ठाकरे, किरण पारधी सरपंच , किरण बन्सोड, थानसिंग हरिनखेडे आणि सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.