26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ गोरेगाव,चिरेखनी व खैरबोडीत आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन

गोरेगाव,चिरेखनी व खैरबोडीत आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन

0
27

गोरेगाव,दि.०५- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात गोरेगाव तालुका खरेदी विक्री संस्थेच्यावतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन खरेदी विक्री संस्थेचे सभापती डॉ.झामqसह बघेले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा मार्केqटग अधिकारी जी.टी.खर्चे,उपसभापती राठोड,बाजारसमितीचे सभापती योगराज चौधरी,खरेदी विक्रीचे संचालक पी.जी.कटरे,डॉ.कटरे,डेमेंद्र रहागंडाले,खेमेंद्र कटरे,शेतकरी दिनदयाल पटले,व्यवस्थापक नुतनलाल रहागंडाले आदीच्या उपस्थितीत पार पडले.
चिरेखनी व खैरबोडीत आ.रहागंडालेंच्या हस्ते उदघाटन
तिरोडा- तालुक्यातील खैरबोडी व चिरेखनी येथे आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. सामुग्री सहकारी संस्था खैरबोडी तसेच स्व.अंजीरादेवी महिला उत्पादक सहकारी संस्था चिरेखनी येथे आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी माजी उपसभापती डॉ. वसंत भगत,बाजार समिती सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार,संचालक चतृभुज बिसेन,जितेंद्र रहांगडाले,तेजराम चव्हाण,श्रावण रहांगडाले,संजय कोठे,घनश्याम पारधी,जयप्रकाश गौतम,दिनेश चोबरे,प.स.सदस्य डॉ.बी.एस.रहांगडाले,पुनाजी पारधी,थानसिंग रहांगडाले,कैलास कटरे,संजय बैस,संजू पारधी,नितिन पारधी,सोनू पारधी,शिवलाल परिहार,राजेंद्र कातुके,ङिलेश पारधी तसेच शेतकरी उपस्थित होते.
मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
सडक अर्जुनी : तालुक्यातील मुरपार/राम येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. गट नेते गंगाधर परशुरामकर, डी.एम.ओ. जी. टी. खरके, कृउबास सभापती अविनाश काशिवार, रूखीराम वाढई, दिनेश कोरे, निशांत राऊत, रूपविलास कुरसुंगे, गजानन परशुरामकर व धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..