अर्जुनी मोरगाव दि.13ः-: सध्या धानाचा हंगाम सुरू झाला आहे. नापिकीचे दु:ख, नैसर्गिक कोप व अवकाळी पावसामुळे धानपिकाचे झालेले नुकसान विसरून जे काही हातात आले ते धान विकायला शेतकरी हमी भाव धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. आधीच डबघाईस आलेल्या शेतकर्यांची धान खरेदी केंद्रावरील लुट खपवून घेतली जाणार नाही. असा निर्वाणीचा इशारा जि.प.सदस्य तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष किशोर तरोणे यांनी दिला आहे.
पत्रकारांना माहीती देताना किशोर तरोणे यांनी सांगितले की, यावर्षी धान उत्पादनासाठी खरीप हंगाम पर्हे पेरणीपासून, रोवणी व त्यानंतरही व्यवस्थित होता. वेळोवेळी खतपाणी, कीटकनाशके देवून धानाचे उत्पन्न बरे होते. हलक्या धानाचे उत्पन्न निघण्याचे मार्गावर असताना तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांचे धान खराबसुद्धा झाले आहे. दु:ख पचविण्याची क्षमता असलेल्या शेतकर्यांनी मिळेल त्या पद्धतीने धानाची मळणी केली आहे. सध्या तालुक्यात शासनाचे सब एजंटच्या माध्यमातून हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची लुट होण्याचे प्रमाण अनेक वर्षांपासून सुरू आहे. र्मजीतल्या शेतकर्यांचे धान चिरीमिरी घेवून पहिले मोजणे, धानकाट्यावर अतिरिक्त धान मोजणे, वजनकाट्याने अतिरिक्त धान मोजणे हे प्रकार आतापयर्ंत अविरत सुरू होते. मात्र यापुढे हमी भाव धान खरेदी केंद्रावर शेतकर्यांची लुट खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर शासनातर्फे दिल्या जाणार्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे, इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने धान खरेदी करावे, कोणतीही बेबंदशाही खपवून घेतली जाणार नाही, असा निवार्णीचा इशाराही किशोर तरोणे यांनी दिला आहे.





