24.4 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती

रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती

0
46

वाशिम, दि. १६ : जिल्ह्यात ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेंतर्गत तसेच बालहक्क सरक्षंण व सुरक्षितता सप्ताह निमित्त बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस विभाग, कामगार विभाग, महिला व बालविकास विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीची सुरुवात शिवाजी विद्यालय येथून झाली, पाटणी चौकबाकलीवाल महाविद्यालय, शिवाजी चौक ते मेन पाटणी मार्केट व त्यानंतर पुन्हा शिवाजी विद्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिवाजी विद्यालयाचे अरुण सरनाईक, वाशिम पोलीस स्टेशनचे निरीक्षक, महिला व बाल विकास विभागचाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयकउपशिक्षणधिकारी, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य तसेच संपूर्ण शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.