पतसंस्थेच्या निवडणुकीत एकतासह अभिनव पॅनेलने मारली बाजी

0
12

गोंदिया- गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनेलने सचिव विजय मिळवीत सत्तेची चाबी हाती ठेवली आहे. तर ग्रामसेवक संघटनेच्या अभिनव पॅनेलने ६ सहा जागा जिंकून पहिल्यांदाच पतसंस्थेत शिरकाव केला. १०५ उमेदवार व त्ङ्मांचे समर्थक मतदारांशी संपर्क करीत ङ्मा निवडणुकीतही राजकीय पक्षाप्रमाणेच साम, दाम, दंड, भेद नीतीचा उपङ्मोग करून आपली पॅनल कशी विजङ्मी ठरणार ङ्माकडे लक्ष केंद्रीत केले होते. सुमारे ६.९ कोटींचे भाग भांडवल असणाèङ्मा ङ्मा पतसंस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्ङ्मासाठी सर्वच पॅनल जिवाचे रान करीत होत्ङ्मा. वर्तमान संचालक मंडळावर मागील ५ वर्षात सभासदाच्ङ्मा हिताला बाधा पोहचविणारे काम करण्ङ्मात आले असून कर्मचारी भरती प्रकरणी गाजलेल्ङ्मा मुद्यांच्ङ्मा आधारे विरोधी चारही पॅनल भडिमार करीत असल्ङ्माने एकता पॅनल विजङ्मी होणार की नाही असे वाटत होते. मात्र एकता पॅनलने सर्वाधिक सभासद निवडूण आणले.
गेल्या महिनाभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडत होता. संजय बनकर यांच्या एकता पॅनेलला शह देण्याकरिता संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. संजय बनकर यांनी गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या हिताकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने सभासदांनी रविवारी (ता. २६) पार पडलेल्या निवडणुकीत बनकर यांच्याच पॅनेलवर शिक्का मोर्तब केला. सोमवारी पार पडलेल्या मतमोजणीत एकता पॅनेलला नऊ, अभिनव पॅनेलला ६, परिवर्तन पॅनेलला तीन, तर समर्थला दोन आणि सहयोग पॅनेल एक जागा मिळविण्यात यश आले.
२१ संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत कुठल्याही पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी महत्त्वाचे सचिव पद एकता पॅनेलचे उमेदवार व संस्थेचे विद्यमान सचिव संजय बनकर यांनी काबीज केले. बनकर यांच्या विरोधात विरोधकांनी भ्रष्टाचाराचे रान पेटविले होते. मात्र, बनकर यांनी त्यांच्या या आरोपातील हवाच या निवडणुकीत काढून टाकली. विशेष म्हणजे परिवर्तनचे प्रल्हाद बैस हे सचिव पदाच्या निवडणुकीत तिसèया क्रमांकावर फेकले गेले. दुसèया क्रमांकावर अभिनव पॅनेलचे छत्रपती काडगाये तर समर्थचे शैलेश बैस हे चौथ्या क्रमांकावर राहिले.
विद्यमान संचालकाच्या विरोधात आधीपासूनच रिंगणात उतरलेल्या परिवर्तन पॅनेलला मात्र मतदारांनी साफ नाकारले. याचे उत्तर कळायला मार्ग नाही. परिवर्तन पॅनेलने एकता पॅनेलच्या वतीने गेल्या पाच वर्षात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चांगलीच पोलखोल केली होती. त्यानंतरही विरोधक एक होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे समर्थ पॅनेलचेही झाले. सहकार पॅनेलला फक्त गोरेगावची जागा सतीश कांबळे यांच्या माध्यमातून qजकता आली. यावेळच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पाच पॅनेल रिंगणात उतरल्या होत्या. यामध्ये अभिनव व सहकार पॅनेल सचिव पदाचा उमेदवार ठरविणार असल्याचे भाकीत साप्ताहिक बेरार टाईम्सने आपल्या आधीच्या अंकात केले होते. अगदी ते भाकीत या निकालाने अधोरेखित केले. या निकालानंतर आता विद्यमान सत्ताधारी एकता पॅनेल व ग्रामसेवक संघटनेच्या अभिनव पॅनेलमध्ये युती होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. अभिनव पॅनेलला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. एकता व अभिनव पॅनेल एकत्र आल्यास सचिव पदांसह १४ संचालकांचे संचालक मंडळ बसणार आहे. विरोधात केवल ६ संचालक राहणार आहेत.
असे लागले निकाल
या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा लढतीत परिवर्तन पॅनेलने ३, समर्थ पॅनेलने २ व सहकार पॅनेलने १ जागा या आपल्या पारड्यात पाडली. भवभूती रंगमंदिर येथे झालेल्या मतमोजणीनंतर हे निकाल जाहीर झाले. जिल्हास्तर व मुख्यालय गटावर एकता पॅनेलने विजय मिळविला. गोंदिया, तिरोडा,अर्जुनीमोरगाव व सडकअर्जुनी पंचायत समितीस्तरावरील संचालकपदी अभिनव पॅनेलने बाजी मारली. विशेष म्हणजे परिवर्तन पॅनेलचे सचिव पदाचे उमेदवार व जि.प.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे यांना यावेळी मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
सचिवपदासाठी एकता पॅनलच्ङ्मा वतीने संजङ्म बनकर निवडूण आले. जिल्हा परिषद मुख्ङ्मालङ्म गटातून शाम लिचडे व प्रमोद मेढे(एकता पॅनल), इतर मागासवर्गीङ्य जिल्हास्तर गटातून गुणवंत ठाकूर(एकता पॅनल), जिल्हास्तरीय महिला गटातून मंजूषा चौधरी, स्नेहल वाटकर(परिवर्तन पॅनल), व वंदना चौधरी(एकता पॅनल) निवडून आल्ङ्मा. जिल्हास्तरीङ्म विजा/भज गटातून प्रमोद कागदीमेश्राम(एकता पॅनल), जिल्हास्तरीङ्म अजा/अज गटातून विजय मडावी(परिवर्तन पॅनल) ङ्मांनी विजय संपादन केले. वर्ग ४ महिला गटातून वनिता ठाकूर तर वर्ग ४ पुरूष गटातून लिलाधर तिबुडे (समर्थ पॅनल) यांनी विजङ्य संपादन केला. पंचायत समिती निहाय प्रवर्गातून ग्रामसेवक संघटनेच्ङ्मा अभिनव पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करीत ६ सभासद निवडून आणले. तिरोडा पं.स.गटातून नरेंद्र अतकरे व श्रीधर आदमने(अभिनव पॅनल), गोंदिङ्मा पं.स.गटातून दयानंद फटींग, खिलेंद्र बिसेन (अभिनव पॅनल) ङ्मांनी विजय संपादन केला. गोरेगाव पं.स.गटातून सहयोग पॅनलच्ङ्मा सतीश कांबळे यानी विजङ्म संपादन केला. सडक अर्जुनी पं.स.गटातून सुभाष सिरसाम तर अर्जुनी/मोर पं.स.गटातून सचिन कुथे (अभिनव पॅनल) ङ्मांनी विजयश्री खेचून आणली. ांदेवरी पं.स.गटातून डी.एच.नान्हे (एकता पॅनल), आमगाव पं.स.गटातून डी.एम.खोटेले (एकता पॅनल) तर सालेकसा पं.स.गटातून शामराव बुद्धे (एकता पॅनल) यनी विजङ्म संपादन केला.