दाभोळकर व पानसरेंच्या मारेकर्‍यांना अटक करा

0
13

गोंदिया : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर व वरिष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याचा निषेध नोंदवीत त्यांना अटक करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ व इतर सामाजीक संघटनांनी केली. यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुकवारी (दि.२४) निवेदन पाठविण्यात आले.
२0 ऑगस्ट २0१३ रोजी डॉ. दाभोळकर यांना पुणे येथे ठार मारण्यात आले. तर १६ फेब्रुवारी २0१५ रोजी गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात उपचारा दरम्यान २0 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरात पानसरे यांचा मृत्यू झाला.
दोन्ही घटनांना मोठा काळ लोटला असूनही त्यांचे मारेकरी व सुत्रधार आजही पोलिसांच्या हाताबाहेर असून मोकाट फिरत आहेत. ही बाब अत्यंत खेदजनक असल्याने याचा निषेध नोंदवित भाकप, भारिप बहुजन महासंघ व अन्य सामाजीक संघटनांनी डॉ. दाभोळकर व पानसरे यांच्या मारेकरी व सुत्रधारांना अटक करण्याची मागणी केली. यासंदर्भात संघटनांनी शुक्रवारी (दि.२४) उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याच्या मुख्यामंत्र्यांना निवेदन पाठविले.
निवेदन देताना भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव करूणा गणवीर, सुरेश खोब्रागडे, भारिप बहुजन महासंघाचे डी.बी.बोरकर, एच.डी. रंगारी, रूपदास मेश्राम, रामदास भोतमांगे, एस.आर.चौरे, हरिचंद रामकुवर, सत्यपाल उईके, चंद्रप्रकाश शेंडे, क्रांती गणवीर, जशोदा राऊत, चंदा इंगळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.