28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ पट्टेदार वाघांच्या लढतीत बिबट्याचा मृत्यू

पट्टेदार वाघांच्या लढतीत बिबट्याचा मृत्यू

0
29

चंद्रपूर,दि.30ः-भद्रावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या सावरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बिबट्याचा मृतदेह आढळला. ही घटना २९ नोव्हेंबरच्या पहाटे घडली असून दोन वाघांच्या लढतीत मादा जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
मागील काही महिन्यापूर्वी याच गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रसाधनगृहात एक बिबट शिरला होता. आता याच गावाच्या किमान २ किलोमीटर अंतरावर बिबट मृत अवस्थेत आढळला. हा बिबट मादा जातीचा असून तो दोन वर्षांचा आहे. गावकर्‍यांना बिबट मृतावस्थेत दिसताच गावकर्‍यांनी याची माहिती वनअधिकारी स्वाती महेशकर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच चमू घेऊन वनअधिकारी घटनास्थळी पोहोचल्या.या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन घटनेचा पंचनामा केला. पंचनामा करीत असताना दोन वाघांच्या पाऊलखुणा दिसून आल्या. त्यावरून दोन वाघांच्या लढतीत मादा जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.