अर्जुनी मोरगाव,दि.05ः- तालुक्यातील सावरगाव येथील आत्म प्रवर्तक मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासीयांच्यावतीने 8 ते 14 डिसेंबर पर्यंत सावरटोला येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात गामगिता तत्त्वचिंतन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाचे उदघाटन रविवारला सकाळी 11.15 वाजता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होणार आहे. पाहुणे म्हणून क.ना. मेंढे, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, ह. भ. प. गजानन महाराज कडाव,रघुनाथ सोनवणे, मधुकर मरस्कोल्हे, नरुले गुरुजी, देवाची कापगते ,काशीराम चचाने ,रतन मेश्राम ह. भ. प. दयाराम मेंढे सरपंच वैशाली राखडे, उपसरपंच भागवत मुंगमोडे, राजकुमार लाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष केशव बांबोडे, पोलीस पाटील शंकर तरोणे, सहकारी संस्थेचे अध्यक्ष यादोराव तरोणे, बोरटोला सरपंच शेवंताबाई गुढेवा उपस्थित राहणार आहेत.





