गडचिरोली,दि.6: भारतरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. तहसिलदार, एन.एम. ठाकरे, श्री. भांडारकर (आस्थापना), नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, बी.एल. सोपनकर, श्री. चव्हाण, विधी अधिकारी श्री. बांबोळे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, वासुदेव कोल्हटकर, व्ही.बी.चहांदे, वाय.बी.मेश्राम, डी.एन.मेश्राम, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.





