गोंदिया,दि.०७ः येथील आदर्श तेली समाज सेवा समितीच्यावतीने ८ डिसेंबरला श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन साईमंगलम लॉन येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श तेली समाज संघटनेचे अध्यक्ष कमल हटवार राहणार आहेत.तर पाहुणे म्हणून झामqसह येरणे,शेषराव गिर्हेपुंजे,फोगलजी साठवणे,डॉ.निशाताई भुरे,राजेश रुद्रकार,प्रा.सागर काटेखाये,प्रा.नामदेव हटवार,प्रा.बाबुलाल करमकर,उमेंद्र भेलावे,डॉŸ.महेश गिर्हेपुंजे,डॉŸ,उल्हास गाडेगोण,दिलीप गभणे,भास्कर येरणे,पी.पी.समरीत,नरेश साहू,राजेश कापसे,कैलास भेलावे,धनलाल पिसे,राजेश चांदेवार,जयाताई धावडे,सुरेश धुर्वे,अनिल राजगिरे,संदिप वैरागडे,डॉ.सुवर्णा हुबेकर,आशा पाटील,एल.एफ.गिर्हेपुंजे,वासुदेव वंजारी,अशोक पडोेळे,गंगाराम बावनकर,विरेंद्र भिवगडे उपस्थित राहणार आहेत.यावेळी सकाळी १० वाजता संताजी चौक शास्त्री वार्ड येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.ही शोभायात्रा मनोहर चौक,जयस्तंभ चौक ,इंगळे चौक,मामा चौक मार्ग साईमंगलम लॉन येथील कार्यक्रमस्थळी पोचणार आहे.यावेळी समाजातील विवाहयोग्य वरवधुंचा परिचय मेळावा,समाज प्रबोधन,रक्तदान शिबिर,हळदी कुंकू कार्यक्रम,रांगोळी स्पधेतील सहभागी विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.





