25.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home रोजगार/व्यापार 16 डिसेंबरला अहमदनगर येथे सैनिकांच्या पाल्यांसाठी सैन्यभरती

16 डिसेंबरला अहमदनगर येथे सैनिकांच्या पाल्यांसाठी सैन्यभरती

0
39

वाशिम, दि. 07 : जिल्हयातील सैनिकांच्या पाल्यांसाठी सैन्यभरतीचे आयोजन अहमदनगर येथे करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक व त्यांच्या विधवांच्या पाल्यांसाठी येत्या 17 डिसेंबर रोजी मेक्नाइड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर अहमदनगर येथे राज्यातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठी सोल्जर जीडी आणि खुल्या प्रवर्गातून सोल्जर ट्रेड्स्मन (म्युझिशियन) आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडू पदांकरिता सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी हरिपाल स्टेडियम मेक्नाइड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर अहमदनगर येथे भरतीच्या एक दिवस पूर्वी म्हणजे 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापुर्वी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. सोल्जर जीडी या पदाकरिता वयोमर्यादा साडेसतरा ते 21 वर्ष, सोल्जर ट्रेडस्मन (म्युझिशियन) या पदाकरीता वयोमर्यादा साडेसतरा ते 23 वर्ष अशी आहे. सोल्जर ट्रेडस्मन (म्युझिशियन) या पदाकरिता भरतीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे वाद्य यंत्र सोबत घेऊन यावे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी या सैन्य भरतीचा लाभ घ्‍यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वाशिम यांनी केले आहे.