26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ उद्घाटनास आठ दिवस लोटूनही धान खरेदीस सुरुवात झालीच नाही

उद्घाटनास आठ दिवस लोटूनही धान खरेदीस सुरुवात झालीच नाही

0
39
सालेकसा,दि.9:मागील आठ दिवसापूर्वी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सातगावच्या धान खरेदी केंद्राचे सुभारंभ आमदार सहषराम करोटे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.  मात्र आठ दिवस लोटूनही अजून धान्य खरेदीस सुरुवात झालेली नाही.  याचा मोठा त्रास परिसरातील  शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.  हा सर्व प्रकार लक्षात घेता शेतकऱ्यांचा वाली कोण ? असाही प्रश्न परिसरातील शेतकरी वर्ग विचारत आहे.
       कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळीच धान विकणे अत्यंत गरजेचे असते हे मात्र सातगाव धान्य खरेदी केंद्र बंद स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना स्वतःचे नुकसान करून व्यापार्यांना कमी मोलात धान विकावे लागते. याचा मोठा फटका परिसरातील शेतकरी बांधवांना सोसावा लागत आहे.   एक दिखावा करण्यासाठी केंद्राचे उद्घाटन करण्यात आली काय असाही सवाल परिसरातील शेतकरी विचारत आहे. साखरीटोला ठिकाणी आधीपासून सुरू असलेल्या केंद्रावर जागा अपुरी असल्याने केंद्र सुरू करण्यात आले नाही असे बोलले जात आहे. नियोजित जागा नसताना केंद्राचे शुभारंभ करण्यात आले तरी कसे ? परिसरातील शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक संस्थेमार्फत करण्यात येत आहे वेळ लोटल्यावर धान्य खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा नुकसान सोसावा लागणार आहे.  परिसरातील जनप्रतिनिधी झोपले आहेत काय असाही सवाल शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येत विचारला जात आहे.