अर्जुनी मोरगाव,दि.09ःसंविधान दिनाच्या निमित्ताने स्थानिक पोलीस ठाण्यातर्फे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून मुलामध्ये प्रविम मलिक तर मुलीमध्ये मयुरी गौतम प्रथम आले आहेत.या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा , महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचे उदघाटन देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केले. त्यावेळी पोलीस निरीक्षक महादेव तोदले, सहा. पोलीस निरीक्षक भुते, पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे, पत्रकार संतोष बुकावन उपस्थित होते. प्रा डॉ प्रदीप भानसे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.विजेत्या स्पर्धकांना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांचे हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम उपस्थित होते. पारितोषिक मुले व मुली अशा दोन गटात विभागून देण्यात आले. मुलांमध्ये प्रवीण मल्लीक ( पं देशमुख क म वि महागाव ) प्रथम, हितेश कांबळे ( जि प क म वि अर्जुनी मोरगाव) द्वितीय , कुणाल चांदेवार ( सरस्वती क म वि अर्जुनी मोरगाव) तृतीय व शिवपाल फुंडे ( यशवंतराव कला महाविद्यालय महागाव) प्रोत्साहनपर पारितोषिकाचे मानकरी ठरले.
मुलींमध्ये जि प कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगावची मयुरी गौतम ही अव्वल ठरली. प्रियंका रॉय ( जी एम बी क म अर्जुनी मोरगाव) द्वितीय तर शुभांगी कनेरवार (इसापूर इटखेडा क म इटखेडा) तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व भारताचे संविधान हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आली. परीक्षक, शिक्षक व पत्रकारांना पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आली. परीक्षक म्हणून प्रा डॉ प्रदीप भानसे व कनिष्ठ व्याख्याता इंद्रनील काशीवार , बोकडे यांनी काम पाहिले.
याच कार्यक्रमात तालुकास्तरीय सांस्कृतिक शाहिरी गायन व कला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वसंता सोनवाने, कांचन कानेकर व सुत्तम लांडगे उपस्थित होते. विजेत्यात वर्ग ६ ते ८ गटातून जयमाला सोनवाने प्रथम, अस्मिता शहारे द्वितीय व योगिता मेश्राम हिने तृतीय क्रमांक पटकावला. वर्ग ९ ते १० या गटातून अभय लाडे प्रथम, गौरव हुकरे द्वितीय व कपिल सरकार तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. या विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार महादेव तोदले यांनी मांडले. संचालन प्रा डॉ शरद मेश्राम यांनी केले तर देविदास शेवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणिक खरकाटे, चीचमलकर, कोटांगले ,घनश्याम मुळे व पोलीस कर्मचारी तसेच शिक्षक भगवंत फुलकटवार, सुनीता हुमे, सुनीता कोकोडे, सत्यवान शहारे, यु.आर. तांदळे यांनी सहकार्य केले.





