30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ आदिवासी गोवारी समाज संघटनेच्यावतीने नाना पटोलेंचा सत्कार

आदिवासी गोवारी समाज संघटनेच्यावतीने नाना पटोलेंचा सत्कार

0
43
गोंदिया,दि.09 : आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष शाळेच्या मैदानात आयोजित नागरी सत्कार समारंभात संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला.
लोकनेते तथा आमदार नानाभाऊ पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे भंडारा-गोंदिया नागरी सत्कार समितीच्या वतीने नवनिर्वाचित आमदार व विधानसभा अध्यक्ष पटोले यांचा सत्कार समारंभ ८ डिसेंबर रोजी स्थानिक सुभाष शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभात खासदार प्रफुल्ल पटेल, डॉ.राजेंद्र गवई, आ.विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.सहषराम कोरोटे, आ.भोंडेकर, आ.कारेमोरे यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र शहर अध्यक्ष सुशील राऊत, दामोदर नेवारे, गोकूल बोपचे, के.के.नेवारे, प्रकाश फुुन्ने यांनी कार्यक्रमस्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  व खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेवून त्यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.

blank