25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ गोंदिया ते जम्मु वाघा बार्डरपर्यंत सायकलिंग करणा-या अशोक व भरत यांचे शहर...

गोंदिया ते जम्मु वाघा बार्डरपर्यंत सायकलिंग करणा-या अशोक व भरत यांचे शहर भाजपातर्फे समान 

0
29
गोंदिया,दि. १४ : :-विश्व शांती व पर्यावरणाचे संरक्षणाचे संदेश सामान्य नागरिकांना जागृत करण्याकरीता गोंदियाचे दोन सायकलिस्ट अशोक मेश्राम व भरतचंद्र बघेले यांनी सायकलने गोंदिया ते जम्मु व वाघा बार्डर पर्यंत प्रवास केला. आणि सायकलने गोंदिया ते जम्मु वाघा बार्डर पोहचतांना दोन्ही युवकांनी देशाच्या नागरिकांना सायकल चालविण्याचे संदेश देत विश्व शांती आणि पर्यावरण संरक्षणाचे हि संदेश दिले. ३५ दिवसांत गोंदिया ते जम्मु वाघा बार्डर सायकलने प्रवास करून दोन्ही सायकलिस्ट रेल्वे ने आगमन झाले. असता गोंदिया सायकल संडे च्या ग्रुपने त्यांचा स्वागत केले  तसेच सायकने एवढी मोठा प्रवास पुर्ण करत नागरिकांना सायकल चालवुन आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. तसेच दोन्ही सायकलिस्ट आत्मविश्वास वाढविण्या करीता गोंदिया शहर भाजपा व्दारे दोन्ही सायकलिस्ट अशोक मेश्राम व भरतचंद्र बघेले यांचे दि. १२ डिसेंबर रोजी भाजपा जिल्हा कार्यालय येथे पुष्पगुच्छ, साल व श्रीफळ देउन सामान हि करण्यात आले. 
यावेळी सायकल संडे टिम च्या अध्यक्षा मंजु कटरे व सचिव रवी सपाटे यांच्या मार्गदर्शनात दोन्ही युवकांनी गोंदिया ते जम्मु वाघा बॉर्डर पर्यंत सायकलने प्रवास कसा राहाला याचा अनुभव हि सांगितलं या दोन्ही सायकलिस्ट शुभेच्छा कार्यक्रमाच्या वेळी  प्रामुख्याने भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नेत्रदीप गोल्डी, गवांडे भरत काका क्षत्रिय, संजीव कुलकर्णी, शम्भु ठाकुर, अशोक जयसिंघानी, बाबा बिसेन, संजु मुरकूटे, मिलिंद बागडे, सुशील राउत, धर्मेंद्र डोहरे, मजीद पठान, बिसेन तसेच सायंकालीन संडे ग्रुप चे मंजुताई कटरे, पत्रकार रवि सपाटे, विजय येडे, नितीन मेश्राम, नरेंद्र बेलगे, विक्की, स्वेता चंद्रबघेले, कल्याणी गाडेकर, त्रिवेणी डोहरे, कृष्णा शेंडे, अजित, श्रध्दा  यादव, दिपक गाडेकर, अंकित धनविजय व अन्य सायकल ग्रुप चे सदस्य व भाजप कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रसार प्रमुख विनोद चांदवानी व्दारा करण्यात आले.