25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणे नावे दुरुस्ती करावी-जिल्हाधिकारी डॉ....

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणे नावे दुरुस्ती करावी-जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी

0
32

गोंदिया दि.14:- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आधार लिंक करणे गरजेचे आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी पीएम किसान पोर्टलवर तात्काळ आधार प्रमाणे नावे दुरुस्ती व आधार लिंक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना व्हावा याकरिता तात्काळ आधार प्रमाणे नाव दुरुस्ती व आधार लिंक करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना स्वत: त्यांची नावे पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार कार्डावरील नावाप्रमाणे दुरुस्ती किंवा त्यांचे आधार लिंक करता येईल. तसेच पात्र लाभार्थ्यांना गावातील जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आधार क्रमांक दुरुस्ती, आधार कार्डावरील नावाप्रमाणे दुरुस्ती करता येणार आहे. या पुढे पात्र लाभार्थ्यास वितरीत करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक आधारीतच करण्यात येणार असल्याचे केन्द्र शासनाने निश्चित केले आहे.

पात्र लाभार्थ्यांना पी.एम किसान पोर्टलवर Farmers Corener मध्ये Edit Aadhaar Failure Records ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमार्फत योजनेच्या लाभार्थ्यांना पोर्टलवर जाऊन स्वत: त्यामध्ये दुरुस्ती करता येईल. तसेच www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर CSC LOGIN या सुविधेमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांना आधार दुरुस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील CSC सेंटर यांना सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक करणे अथवा आधार कार्डावरील नावाप्रमाणे दुरुस्ती करण्याची सेवा पुरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.