24 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ रजेगाव रुग्णालयात आय़ोजित शिबिरात 1200 विद्यार्थ्यांची तपासणी

रजेगाव रुग्णालयात आय़ोजित शिबिरात 1200 विद्यार्थ्यांची तपासणी

0
47

गोंदिया,दि.15ः- तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे रुग्णालयातंर्गत येत असलेल्या विविध शाळामंधील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर 12 ते 14 डिसेबंरपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत 1200 विद्यार्थ्यांची complete blood count , Hb , rbc, wbc , platelets, blood group आणि sickle cell test आदी तपासणी करण्यात आली.या तपासणीमधून 45 विद्यार्थी हे sickle cell positive आढळले असून त्या विद्यार्थ्यांना योग्य तो सल्ला देण्यात आला.तसेच घ्यावयाची काळजी आणि  संक्रमित होऊ नये व आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी करावी लागणार्या उपाययोजनेबद्धल डॉ.गजानन चौधरी यांनी मार्गदर्शन केले.हे शिबिर डाॅ.संजिव दोडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी प.सदस्या विमल पटले,रजेगावचे सरपंच वंदना रहागंडाले यांच्यासह,डॉ.गजानन चौधरी,अमोल बारेवार ,सोमनाथ मुंढे,अविनाश चोपकर,शंकर वाढीभस्मे,सुभाष पटले,गीता कापसे,अश्विनी सातपुते,योगिता रहांगडाले,दुर्गा चौधरी,उमेश्वरी तुरकर,भारती राऊत ,कविता हत्तीमरे, विकलाव पटले,भारती बोपचे,झाकीर खान यांच्यासह संबधित शाळेचे शिक्षक,पालकांचे सहकार्य लाभले.

blank