25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ अखेर भीमनगरवासीयांना ३० वर्षांनंतर मिळाला न्याय

अखेर भीमनगरवासीयांना ३० वर्षांनंतर मिळाला न्याय

0
26

अर्जुनी मोरगाव,दि.24ः- तालुक्यातील सोमलपूर ग्रामपंचायतअंतर्गत येणार्या भीमनगर नवीन वसाहतीला जाण्याकरिता मागील ३० वर्षांपासून पक्का रस्ताच नव्हता. सदर विषयाचा वारंवार पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांना लिहा परिषदेकडे केला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली असता तब्बल ३० वर्षांनी भीमनगरवासीयांना न्याय मिळाला असून रस्ता बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.दरम्यान, सन २०१८-१९ च्या ५०५४ हेड अंतर्गत भुरशीटोला ते भीमनगर रस्त्याला वीस लक्ष निधी मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी, २१ डिसेंबर रोजी करण्यात आले. सोमलपूर ग्रामपंचायतचे सरपंच नीलेश खुणे, उपसरपंच मार्वंâड बडवाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, काँग्रेसचे कार्यकर्ते मोरेश्वर सोनवणे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले. सदर कामाची सुरुवात झाल्यामुळे भीमनगरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून जि.प.सदस्य तरोणे यांचे आभार मानले आहे.