गडचिरोली,दि.1: अंधश्रध्दा, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाव, कुटूंब नियोजन आदि. विविध विषयावर होणाऱ्या मानव धर्माच्या सेवक संम्मेलनात जनजागृतीपर , समाज सुधारणेच्या दृष्टीने वडसा तालुक्यातील किन्हाळा मोहटोला येथील सोमाजी बांडे यांच्या भव्य आवारात 3 जानेवारी 2020 रोजी शुक्रवारला मानव धर्माच्या सेवक संमेलनाचे आयोजन केले आहे. तत्पुर्वी याप्रसंगी ग्रामस्वच्छता अभियान दिनांक 2 जानेवारी 2020 ला गुरवारी करण्याचे निश्चित केले आहे. यावेळी सर्व सेवक वर्ग व गावातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक त्र्यंबक लांजेवार, विजय दोनाडकर, नरेश राजगडे, मुन्ना नागलवाडे, भाग्यवान पारधी, माणिक मेश्राम, रवि लांजेवार, तसेच कार्यक्रमाचे सुत्रधार डॉ. गोविंदरावजी दोनाडकरसह कार्यकारिणी मंडळातील सर्व सदस्यगण उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे शुभारंभ सकाळी 7.00 वाजता फरीझरी येथून शोभायात्रा काढण्यात येईल. यामध्ये सामाजिक जागृतीपर झांकी, सांस्कृतीक कार्यक्रम, गरभानृत्य प्रासंगिक वेशभुषाकरुन सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी 5.00 वाजतापासून सांस्कृतिक कार्यक्रमात एकांकिका नाटय तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील नागरिक, दुखी : कष्टी नागरीकांनी या समाजजागृतीपर कार्यक्रमाचा मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली जिल्हयाचे परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक दिवाकरजी ठेंगरे व फाल्गुनजी मानकर यांनी केले आहे.




