28.3 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home महाराष्ट्र भीमा कोरेगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विजयस्तंभाला अभिवादन

भीमा कोरेगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विजयस्तंभाला अभिवादन

0
37

पुणे,दि.१  – कोरेगाव भीमा येथे आज १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  उपस्थित राहून विजयस्तंभाला अभिवादन केले. सोहळा शांततेत पार पाडवा यासाठी नागरिकांना आवाहन करीत अफवा वर विस्वास ठेवू नका,शूर वीरांना वंदन करण्यासाठी सर्वांनी यावे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. १ जानेवारी १८१८ मध्ये याठिकाणी झालेल्या लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या महार रेजिमेंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना अभिवादन केले.पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने; तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.