26.9 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ खासदारांनी घेतला नागझिरा अभियारण्याचा पर्यटन विकासासाठी आढावा

खासदारांनी घेतला नागझिरा अभियारण्याचा पर्यटन विकासासाठी आढावा

0
24
गोंदिया,दि.02- भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्तावित पर्यटन सर्किट मधील अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या नागझिरा अभयारण्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने विस्तृत आढावा खासदार सुनील मेंढे यांनी नागझिरा अभयारण्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठकीच्या माध्यमातून घेतला.यावेळी नागझिरा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे, नवेगावचे  सहवनसंरक्षक प्रदीप पाटील, पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे तसेच नागझिरा अभयारण्याचे सह वनसंरक्षक तनपुरे आदी उपस्थित होते.
नागझिरा अभियारण्यात असणाऱ्या तलावांची दुरुस्ती, खोलीकरण विषयी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती खासदार मेंढे यांनी दिली. आगामी काळात अभियारण्यात सर्व प्रकारच्या वन्यजीवांची संख्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची आवश्यकतेवर भर देण्यात आले.दरम्यान विदर्भतील अन्य अभियारण्य असणाऱ्या केंद्रानुसार नागझिरा येथे देखील एक माहिती केंद्र (interpretation centre) सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मेंढे पुढे म्हणाले.