26.9 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ गोंदिया,गडचिरोली,वाशिम पोलीस दलाच्यावतीने आज ‘सायबर सेफ वुमेन’ मोहीम

गोंदिया,गडचिरोली,वाशिम पोलीस दलाच्यावतीने आज ‘सायबर सेफ वुमेन’ मोहीम

0
31
  • महिला, बालकांवरील अत्याचार व सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती
  • हॅपी फेसेस स्कूल येथे विद्यार्थिनी, महिलांसाठी कार्यशाळा

गोंदिया/गडचिरोली/वाशिम, दि. ०२ : महिला व बालकावर होणारे अत्याचार, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व या अत्याचारांसंदर्भातील कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज, ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता हॅपी फेसेस स्कूल येथील सभागृहात,गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात तर गडचिरोली येथील विज्ञान महाविद्यालयात सकाळी 9.45 वाजता व फुले आंबेडकर काॅलेज आॅफ सोशल वर्क येथे दुपारी 12 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे,वाशिमा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व गडचिरोली पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे उपस्थित विद्यार्थिनी, महिलांना ‘सायबर सेफ वुमेन’ या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.

सध्याच्या संगणकाच्या, तांत्रिक, धावपळीच्या युगात तरुणी, महिला कशा प्रकारे सायबर संबंधित गुन्ह्यांना बळी पडतात, अशा गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, तसेच सायबर गुन्हे विषयक कायदे याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ‘सायबर सेफ वुमेन’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कार्यशाळेला शहरातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.