25.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्ह्यात विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
88

आमगाव,दि.3 ः तालुक्यातील छत्रपती विद्यालय सितेपार येथे मुख्याध्यापक एम.एस.पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताच्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई व महात्मा फुलेंची वेशभुषा करुन विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती पटवून दिली.शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत तंबाखू आणि प्लास्टिक मुक्ती संदर्भात शपथ घेतली.यावेळी ओ.एम.बोपचे,आर.एस.जैतवार, जे.डी.कटरे, एस.एम.सुयंवंशी आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सेजगावः– येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालीका दिन व स्त्रिमुक्ती दिन म्हणून साजरा केला गेला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्योतीताई भालाधरे होत्या तर प्रमुख पाहुणे चंदाताई शिवनकर, डूडेश्वरी कटरे, शोभाताई मंदूरकर, मनिषाताई नेवारे  उपस्थित होते.प्रास्ताविक एन.जी.पारधी मुख्याध्यापक यांनी केले.विद्यार्थ्यांमधून साक्षी शरणागत,शिवाणी परतेती यांनी विचार व्यक्त केले.तर प्रांजली बडगे, आरती पारधी, पुजा गोटे, साक्षी शरणागत, खुशी पारधी, रिया गायधने यांनी गीत गायन केले.संचालन पी.पी.भालेराव व आभार प्रदर्शन ए.टी.ऊके यांनी केले .आयोजनासाठी एस.एन.पटले एम.एल राहांगडाले एस.सी.राहांगडाले एन.ए.कटरे पी. बी. पटले यांनी सहकार्य केले.blank

देवरी -हरदोली येथे आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला देवरी/आमगाव क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्षा जि.प.सदस्या उषाताई शहारे,मुख्याध्यापक बबलू कटरे,श्री.जनबंदू,सरपंच शिवचरण खैरे,श्री.डोगरे,सौ.उदापुरे,श्री रंगारी ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच  आमदार सहसराम कोरोटे यांच्या निवासस्थानी *क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले* जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाईंच्या  फोटोला  माल्यार्पण करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया,जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे,बळीरामजी कोटवर,वसंत पुराम,ओमराज बहेकर,बबलु कुरेशी,कुलदीप गुप्ता,प्रशांत कोटांगले,अमित तरजुले,संदीप मोहबिया,नरेश सहारे,नितीन धुर्वे,राजेश गहाणे,संजय बलगये,जयपाल प्रधान,संजय राऊत,सौ.उदापुरे,ताराबाई टेम्भुरकर,सौ कोचे उपस्थित होते. संचालन प्रशांत कोटांगले व आभार कमलेश पालिवाल यांनी केले.

गोरेगांव:- तालुक्यातील मोहगाव(बु.)येथील परशुराम विद्यालय येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मुख्याध्यापक बी.डब्लू.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.त्याचप्रमाणे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अंतर्गत जी.इ.एस विद्यालय तथा महाविद्यालय कुऱ्हाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.टी. भगत होते.भगत यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच समतादूत राजरत्न मेश्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन करतांना आज ग्रामपंचायत सदस्यापासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत महिलांना जाण्याची जी संधी मिळाली,ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच हे पटवून दिले.यावेळी  कु.सि.एम.वंजारी,आर.डी. बघेले  यांनी सावित्रीबाईच्या कार्यावर विचार मांडले.कार्यक्रमाला कु. व्ही. एम. देशपांडे,मुख्याध्यापीका,कु.व्ही.बी. भिवगडे,एस.एन.कापगते,आय.एन.उकरे,एम.वाय.बिसेन,कु.के. बी.टेंभरे,कु.पी.एस.बोपचे,आर. एम.मटाले,कु.वैधारभी राउतकर,कु.अक्षदा नंदेश्वर,कु.खुसबू बघेले यांनीही विचार व्यक्त केले.संचालन गौरी चौधरी हिने तर आभार रोशनी शरणागत हिने मानले.