गोंदिया, दि.04-जिल्हातील ९५५ गावापैकी पिक नसलेली 36 गावे वगळता 919 गावांची आणेवारीही 50 पैशाच्यावर आली आहे. जिल्ह्यातील ३6 गावात पिक घेण्यातच आलेले नाही,त्यामध्ये २3 रीठी गावे असून १२ गावे ही बुडीत(धरणाखाली)क्षेत्रातील व 1 गावात पीक यावर्षी घेण्यात आलेेले नाही.गोंदिया जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही ०.88 पैसे दाखविली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १५३ गावापैकी १५३ गावांची आणेवारी 0.96 पैसे,गोरेगाव तालुक्यातील ९४ गावांची आणेवारी ०.81 पैसे, तिरोडा तालुक्यातील १२3 गावांची आणेवारी ०.७6 पैसे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची आणेवारी ०.91 पैसे,देवरी तालुक्यातील १२८ गावांची आणेवारी १.०8 पैसे, आमगाव तालुक्यातील 83 गावांची आणेवारी 0.91 पैसे, सालेकसा तालुक्यातील 86 गावांची आणेवारी ०.8३ पैसे व सडक अर्जुनी तालुक्यातील 104 गावांची अंतिम आणेवारी ०.८1 पैसे काढण्यात आलेली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 11 गावात,गोरेगाव 5 ,तिरोडा 2,देवरी 7,सालेकसा 6 व सडक अर्जुनी तालुक्यातील 5 गावामध्ये पीक नसल्याने या गावांची आणेवारी काढण्यात आलेली नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 66 धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत 10 लाख 78 हजार 200 क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने 44 केंद्रावर 4 लाख 80 हजार क्विंटल असा सुमारे 15 लाख क्विंटल धान यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी करण्यात आलेला आहे.मात्र खरेदी केलेला धान भरडाईसाठी अद्यापही न उचलल्याने व जिल्ह्यातील 160 गोदाम हाऊसफुल झाल्याने गोदामाबाहेर मोठ्याप्रमाणात असलेल्या धानाचे अवकाळी पावसाने नुकसान केले आहे.त्यातच शेतकर्यांना अद्यापही चुकारे मिळण्यास सुरवात झालेली नाही.




