27.2 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय महामार्गाचा खासदारांकडून आढावा

राष्ट्रीय महामार्गाचा खासदारांकडून आढावा

0
32
लाखनी,दि.04ः- लाखनी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा आढावा खासदार सुनील मेंढे  यांनी आज घेतला. खासदारांनी बैठकीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.बैठकीला नगराध्यक्षा ज्योतिताई निखाडे, तहसीलदार विराणी, नगर परिषद मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, पोलीस निरीक्षक मंडलवार, जे.एम.सी.मॅनेजर शुक्ला, राष्ट्रीय महामार्गाचे रमेश यादव, शेषराव गिर्हेपुंजे, शिवराम गिर्हेपुंजे, अंगेश बेहलपाडे, कोमल गभने, बापू खेडीकर, अर्पित गुप्ता, किशोर वाघाये, प्रशांत खेडीकर आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने सर्व्हिस रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन तातडीने सर्व्हिस रस्त्याची डागडुजी करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. तसेच नादुरुस्त झालेल्या ड्रेनेजची दुरुस्ती आणि नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाची पूर्ततेचा देखील आढावा खासदारांनी घेतला. दरम्यान रस्त्याच्या कामामध्ये होत असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी संबंधितांशी चर्चा करीत हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे मेंढे यानी सांगितले. स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या सूचना देखील दिल्या.दरम्यान महामार्गाच्या रखडलेल्या अन्य कामांची पूर्तता देखील तातडीने करण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांना दिले.