28.9 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार

0
35

अर्जुनी मोरगाव,दि.16ःदि बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने चाइल्ड राईट अलायस आणि अपेक्षा होमिओ सोसायटी मोझरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ३0 जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्लिश ई टीच उपक्रम श्री. संदीप मडामे राबवित आहेत. या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. हा सोहळा १२ जानेवारीला अमरावती जिल्ह्याच्या अपेक्षा होमिओ सोसायटी गुरुकुंज,मोझरी येथे पार पडला. सन्मानित झालेल्या शिक्षकांमध्ये जि.प.प्राथ.शाळा बोंडगाव देवी येथील शिक्षक व्ही.एन. चिचमलकर, जि.प. प्राथ.शाळा सोमलपूर येथील शिक्षिका कु. एस.ए. नवखरे यांचा समावेश आहे. प्रधान सचिव मा. नंदकुमार जी राजशिष्टाचार विभाग महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पंचायत समिती अर्जुनी मोर चे गटशिक्षणाधिकारी मांढरे सर, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिरसाठे, बरईकर, बागडे, तसेच विषय साधन व्यक्ती रामटेके, पडोळे, मेर्शाम, ढोके, मेर्शाम, पातोळे, शहारे, कापगते यांनी हा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल श्री. मडामे यांनी आभार मानले.