गोंदिया,दि.17ः-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे महिलांसाठी पहिली स्त्री शिक्षणाची समाज परिवर्तनाची सुरुवात केली हीच प्रेरणा घेऊन आज महिला आणि तरुणांना स्वावलंबी होण्याची गरज आहे.नोकरीचे साधन कमी असल्याने महिलांनी व्यवसाय करायला हवे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजात नाविन्यपूर्ण घडवून समाज प्रबोधन सोबतच समाजातील रूढी परंपरा वर घात करत समाज जागृत करण्याचे कार्य केले. त्याच पद्धतीने आज तरुणांनी आणि महिलांनी पारंपरिक पद्धतीत बदल करून व्यवसायाकडे वाढण्याची गरज आहे. त्यातून समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे आव्हान आमदार विनोद अग्रवाल यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या आयोजित जयंती समारोह निमित्त केले. फुले शाहू क्रीडांगण गर्रा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल उद्घाटक म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरीताई हरिणखेडे होते. तर विशेष अतिथि म्हणून राजेश नगरीकर, सरपंच सौ. डिलेश्वरी येडे, सदस्य जि. एस. बरडे, समता परिषद अध्यक्ष धन्नालाल नागरीकर, पोलिस पाटील कल्पना बागडे, सविता बेदरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम पंचायत सदस्य गर्रा व ग्रामवासीयांनी यांनी परिश्रम घेतले.





