तिरोडा,दि.17:- हावडा मुंबई रेल्वेमार्गावरील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रेल्वेविषयक समस्या सोडविण्यात यावे.यासोबतच इंग्रजकाळापासून बरबसपूरा येथे असलेले पुल सध्या बंद करण्यात आल्याने शेतकरी व जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच गंगाझरी येथील पुल अरुंद असल्याने पावसाळ्यात पाणी साचतो त्यामुळे या सर्व समस्यांची दखल घेत त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात यावे यासाठी आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक श्रीमती शोभना बंडोपाध्याय व वाणिज्य प्रबंधक (यांत्रिकी) यांच्याशी आज(दि.17)गोंदिया येथे चर्चा केली.त्यावेळी त्यांच्यासोबत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल व रेल्वेचे अधिकारी तसेच मतदारसंघातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.बरबसपुरा येथील एल. सी. न 517 पूल सद्या बंद करण्यात आल्यामुळे इंग्रज कालीन काळापासून सुरू असलेला मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाण्याकरिता अडचण निर्माण झाल्याने तो रस्ता तात्काळ शेतकऱ्यांना जाण्यासाठी सुरू करण्यात यावे. त्याचप्रमाणे गंगाझरी येथे पुलिया क्र.153 हा अत्यन्त अरुंद असल्यामुळे पावसाळ्यात तसेच इतर दिवसातही पाणी साचत असल्यामुळे शेतकऱ्यांचा मार्ग बंद नेहमी बंद पडतो त्यावर रेल्वे विभागाने सदर पुलाची दुरुस्ती करून पुलाची रुंदी वाढविण्यात यावे. तिरोडा येथे मुख्य रस्त्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू असून सर्व शासकीय कार्यालये या रस्त्यावर असल्याने रेल्वे विभागाने आस्वल चौक ते तहसील कार्यालयापर्यंत जाणारा रस्ता रेल्वे विभागातर्फे दुरुस्त करावा, गणखैरा येथील पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, पुरगाव येथे रेल्वे विभागातर्फे शेतकऱ्यांच्या शेतामधून टॉवर लाईनच्या कामाचा योग्य मोबदला रेल्वे व महापारेशन कंपनी तर्फे देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करुन चर्चा करण्यात आली.





