पिपरटोला येथे बिबट्याने केले गोऱ्ह्याला ठार

0
15

गोरेगाव,दि. 11 – वनपरिक्षेत्र अंतर्गत पिपरटोला जंगलात बेपत्ता मादी बिबटला शोधण्यासाठी गेलेल्या वन्यप्रेमींना एक गोऱ्हा मृतावस्थेत आढळला. बिबटने त्या गोऱ्हयाला ठार केल्याचे सांगण्यात आले. परंतु त्या गोऱ्हयाची शिकार करणारा बिबट ‘ती’ मादा आहे किंवा नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्या परिसरात तीन कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

गोरेगाव तालुक्याच्या पिपरटोला येथील जंगलपरिसरात मादा बिबटचा शोध घेण्यासाठी भारतीय वन्यजीव न्यासचे अनिलकुमार, सौम्यदास गुप्ता, ज्ञानेश्वर राऊत गेले असता त्यांना पिपरटोला येथील पोलीस पाटील भोजराज शिवणकर यांच्या शेतात एक गोऱ्हा मृतावस्थेत आढळला. तो गोरा प्रेमलाल येडे यांचा होता. येडे यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर बिबट्याने त्या गोऱ्हयाला ठार केले. ही घटना रविवारी सकाळी ७.४५ वाजता दरम्यान उघडकीस आली. याची मािहती त्यांनी उपवनसंरक्षक गोंदिया व गोरेगावच्या वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालायाला दिली. चोपा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेंद्र पटले यांनी त्या गोऱ्हयाचा पंचानामा केला. त्या गोऱ्ह्याला एका जागी ठार करून बिबटने दुसऱ्या ठिकाणी ओढत नेले. ती शिकार बिबट्यानेच केली हे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र त्या मादा बिबटने ही शिकार केली की दुसऱ्या बिबटाने केली हे स्पष्ट झाले नाही. त्यासाठी त्या ठिकाणी त्या मादा बिबटची ओळख पटविण्यासाठी तीन कॅमेरे त्या परिसरात वन्यजीवचे मानद सदस्य सावन बहेकार यांच्या मदतीने लावण्यात आले. त्या गोऱ्हयाच्या मासासाठी बिबट आले तर ते मादा आहे का याचा शोध कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.