33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ तेली समाजाने ओबीसी म्हणून एकत्र या-प्रा.बाबूलाल करमकर

तेली समाजाने ओबीसी म्हणून एकत्र या-प्रा.बाबूलाल करमकर

0
36
संताजी महाराज जयंती महोत्सव संपन्न
सालेकसा,दि.09ः-वर्तमानात प्रत्येक समाज जाती-जातींमध्ये विभागतांना दिसत आहेत. हे विभाजन कुठेतरी थांबणे काळाची गरज असून संविधानिक दृष्ट्या आपला हक्क मिळविण्यासाठी  ओबीसीतल्या तेली जातींसह अनेक जातींनी एकत्रित येऊन ओबीसीचा लढा उभारणे अत्यंत गरजेचे आहे. ओबीसीची स्वतंत्र जनगणना झालीच पाहिजे असे ध्येय उराशी बाळगून एकीचे बळ प्रस्तापित करूया असे प्रतिपादन बाबूलाल करमकर यांनी केले. ते विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने गडमाता देवस्थान सभागृह सालेकसा येथे आयोजित श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शक स्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. मी जनतेचा सेवक असून जनतेच्या वेदना संवेदनांची जाणीव मला आहे. ओबीसींनी एकत्रित येऊन आपला लढा उभारावं मी सदैव समाजाच्या पाठीशी आहे. असे वक्तव्य करून तेली समाजासाठी समाज भवनाच्या उभारणीत लागणारा निधी उपलब्ध करून देणार असे आश्वासन देत उपस्थितांना मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानावरूनआमदार सहसराम कोरोटे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तेली समाजाच्या वतीने आमदार कोरोटे यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोषजी खोबरागडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजाचे केंद्रीय सरचिटणीस डॉ. नामदेव हटवार, युवा आघाडी अध्यक्ष शेषराव गि-हेपुंजे तर प्रमुख अतिथी म्हणून पुष्पकुमार सोनबोईर, राजेश चांदेवार, गुनाराम मेहर, सुभाष मोटघरे, सरिता वंजारी, अलका कृपान, भास्करजी येरणे, माया खोब्रागडे, नंदकिशोर लांजेवार, चमन हटवार, विजय मोटघरे, भाऊराव मोटघरे यांच्यासह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तर स्वागताध्यक्षस्थानी डॉ. हिरालाल साठवणे होते.
समाजातील तरूणाईने पुढाकार घेऊन समाज उत्थानार्थासह समाज विकासासाठी सज्ज व्हावे ! तसेच विविधांगी विकासाबरोबरच समाजाचा आर्थिक विकास कसा करता येईल यासाठी ही प्रयत्नशील असले पाहिजे ! असे प्रेरणादायी वक्तव्य कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक स्थानावरून नामदेव हटवार यांनी केले.  कार्यक्रमाचे औचित्य साधून वधु वर परिचय मेळावा घेण्यात आला असल्याने समाजातील युवक-युवतींनी यावेळी मोठ्या संख्येने वधू-वर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदविला. विविध मागण्या बरोबरच समाजाच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण रेखाटणारे प्रास्ताविक तेली समाजाचे तालुका अध्यक्ष प्रा. सागर काटेखाये यांनी मांडले तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन राहुल हटवार यांनी केले. उपस्थितांचे आभार गुनाराम मेहर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय येरणे, टेकचंद चिंधालोरे, गुलाब मदनकर, संतोष वैदय, संतोष कापसे,राजु गभणे, नरेंद्र भेलावे, संतोष गि-हेपुंजे, राहुल साठवणे, महेंद्र कापसे, विनोद चकोले, मीना बावनकर, ममता कापसे, रजनी गभणे, पिंकी कापसे, पुस्तकाला येरणे, अनुसया बागडकर, कांता लांजेवार, प्रेमलता देशमुख, यशवंता मेहर, सुरेखा गि-हेपुंजे यांच्यासह तेली समाज महासंघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.