29.5 C
Gondiā
Wednesday, July 8, 2026
Home विदर्भ राज्य सेवा पूर्व परीक्षेचे २६ एप्रिल रोजी आयोजन

राज्य सेवा पूर्व परीक्षेचे २६ एप्रिल रोजी आयोजन

0
110

वाशिम, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० चे आयोजन ५ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत वाशिम शहरातील ०७ परीक्षा उपकेंद्रांवर करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २२ मार्च २०२० रोजीच्या पत्रानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० आता रविवार, २६ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे ३० मार्च २०२० रोजी आयोजित  परीक्षेसंबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशिक्षण वर्गाच्या सुधारित तारखेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे परीक्षा केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.