30.8 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ मुख्य बाजारपेठेतील भाजीबाजार बंद;सहा ठिकाणी स्थानांतरण

मुख्य बाजारपेठेतील भाजीबाजार बंद;सहा ठिकाणी स्थानांतरण

*गर्दी टाळण्यासाठी उपायोजना*

0
311

गोंदिया दि. 27:: कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन देशभर बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी गोंदियाच्या गंजबाजार येथील मुख्य बाजारपेठेतील ठोक आणि चिल्लर भाजी व फळ विक्रेत्यांची दुकाने शहरातील इतर भागात स्थानांतरित करण्यात येत आहे.

नगर परिषद सुभाष शाळा, हिंदी टाऊन शाळा, गणेश नगर येथील प्राथमिक शाळा,रामनगर शाळा आणि गोंदिया(खुर्द) प्राथमिक शाळेच्या प्रांगणात फळांची व भाजीपाल्याची दुकाने स्थानांतरीत करण्यात आली आहे.२८ मार्चपासून इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे देखील भाजीपाला व फळांची दुकाने खरेदीसाठी उपलब्ध राहणार आहे.

तरी शहरातील नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी वरील ठिकाणी लावण्यात येणाऱ्या भाजी व फळांच्या दुकानातून भाजीपाला व फळांची खरेदी करावी. खरेदी करताना अंतर ठेवावे. स्वतःच्या आरोग्याची जपणूक करावी. असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी केले आहे.