30.8 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home Top News गोंदिया जिल्ह्यात कोरोना’चा एक रुग्ण

गोंदिया जिल्ह्यात कोरोना’चा एक रुग्ण

0
1467

गोंदिया,दि.२7:जिल्ह्यातील थायलंडमधून आलेला एका 23 वर्षीय युवक कोरोना विषाणू बाधित असल्याचे आज 27 मार्च रोजी निष्पन्न झाले आहे.सदर युवकाने एका कोरोना विषाणूने बाधित प्रवाशासोबत परदेशातून प्रवास करून 17 मार्च 2020 रोजी तो गोंदियाला परतला. त्याचा प्रवास इतिहास पाहून त्याला वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करण्यात आले होते. परंतु सदर युवकाला 25 मार्चपासून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन 26 मार्च 2020 रोजी तपासणीकरिता सदर युवकाच्या घशाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते.

आज 27 मार्च रोजी सकाळी युवकाला कोरोना बाधित असल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे आज युवकाच्या कुटुंबातील चार सदस्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून सर्व सदस्यांचे नमुने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहे. बाधित युवकावर उपचार सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये.गर्दी करू नये. आवश्यकता असेल तर बाहेर गेल्यास सोशल डिस्टन्स ठेवावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.