स्थानिक विकास निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

0
7

तिरोडा दि.६: तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या अर्जुनी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमीपूजन केले.
अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष चतुर्भूज बिसेन होते. प्रमुख पाहुणे म्हणून हेमराज अंबुले, बाळू रहांगडाले, तारेंद्र भगत, रमेश बागळे, महेंद्र बागळे, कवळू अंबुले, तारेंद्र अंबुलेसह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भूमीपूजन करण्यात आलेल्या कामांत चांदोरी खुर्द येथे शिव मंदिर जवळ सभा मंडप, इंदोरा बु. येथे सिमेंट रस्ता, बिहीरीया सिमेंट रस्ता, बघोली येथे सिमेंट रस्ता, परसवाडा येथे सामाजिक सभागृह, सिमेंट रस्ता व नाली, खैरलांजी येथे सिमेंट रस्ता व नाली, पिपरीया येथे सिमेंट रस्ता व नाली, अर्जुनी येथे सिमेंट रस्ता, नाली व रस्ता खडीकरण, किडंगीपार येथे रस्ता खडीकरण, गोंडमोहाडी येथे सिमेंट रस्ता, बोदा येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचा समावेश आहे.
याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, नागरीकांनी जे काम सांगीतले त्यानुसार प्राथमिकतेने निधी दिला व आणखी अनेक योजनांतर्गत निधी मिळवून देऊन गावाला निधी कमी पडू देणार नाहीअसे सांगीतले. संचालन करून आभार मनोहर बुध्दे यांनी मानले.