माजी जि.प.अध्यक्ष ठवरे व सदस्य दहिवलेंचा काँग्रेस प्रवेश

0
22

गोंदिया ,दि. ८ -गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी व अजुर्नी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज सोमवारी अर्जुनी मोरगाव येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे तसेच विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी करुन निवडणुक लढविणारे माजी जि.प.सदस्य रत्नदिप दहिवले यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,माजी आमदार सेवक वाघाये,रामरतन राऊत,सहेसराम कोरेटी,किरणताई कांबळे,तालुकाध्यक्ष भागवत पाटील नाकाडे आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.या मेळाव्यात काँग्रेस पक्ष बळकटीकरणासोबतच येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्याचे आवाहन माणिकराव ठाकरे यांनी केले.