झारखंडमध्ये गोळीबारात 12 माओवादी ठार

0
8

वृत्तसंस्था
रांची दि. ९ — झारखंडमधील पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांच्या मोटारीवर केलेल्या गोळीबारात 12 माओवादी ठार झाले आहेत. तर, गोळीबारात एकही सुरक्षा रक्षक जखमी झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलामू जिल्ह्यातील सतबरवा जंगलातील एका रस्त्यावरून माओवादी स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून सुरक्षा रक्षकांनी गाडीवर गोळीबार करत गाडीतील 12 माओवाद्यांना ठार मारले. माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.

माओवाद्यांकडून 8 रायफल्स आणि 220 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात शोधमोहिम करण्यात येत आहे.