26.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ नागरीकांच्या सोयीसाठी जिल्हयातील कोविड-19 व नॉन कोविड रुग्णालयाची माहीती

नागरीकांच्या सोयीसाठी जिल्हयातील कोविड-19 व नॉन कोविड रुग्णालयाची माहीती

0
466

गडचिरोली, (जिमाका),दि.27:  गडचिरेाली जिल्हयामध्ये कोरोना कोविड-१९ विषाणु आजाराच्या व्यवस्थापणाकरीता कोविड निगा केंद्र (CCC) स्थापण करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा कोविड आरोग्य केंद्र (DCHC) व जिल्हा कोविड रूग्णालय (DCH) सुद्धा स्थापण करण्यात आलेले आहेत. कोविड रुग्णालय व नॉन कोविड रुग्णालयाची यादी प्रशासनाकडून जागेचे नाव व त्या ठिकाणी असलेल्या बेडची क्षमता या माहितीसह प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर, (CCC) गडचिरोली मध्ये पुढिलप्रमाणे आहेत –

  1. एकलव्य विद्यालय मुलांचे वसतिगृह, अहेरी -100,
  2. एकलव्य विद्यालय मुलींचे वसतिगृह, अहेरी – 100
  3. शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह वडसा – 100,
  4. शासकीय आदीवासी मुलांचे वसतिगृह,कोरची – 85
  5. शासकीय आदीवासी मुला मुलींचे वसतिगृह बर्डी आरमोरी -140
  6. शासकीय आदीवासी आश्रमशाळा मुलचेरा – 50
  7. आदीवासी  मुला मुलींचे वसतिगृह चामोर्शी -100
  8. एसटी मुलांचे वसतिगृह कुरखेडा -150
  9. आदीवासी  मुलांचे वसतिगृह, धानोरा – 100
  10. केजीबीव्ही मुलींचे वसतिगृह सिरोंचा – 100
  11. शासकीय इंग्रजी आश्रमशाळा नवेगाव गडचिरोली -100
  12. आरएमएसए वसतिगृह एटापल्ली -100
  13. कस्तुरबा बालीका शाळा भामरागड -150

जिल्हा कोविड आरोग्य केंद्रांची माहिती (DCHC) – या रुग्णालय मध्ये मध्यम स्वरुपाचे गंभीर रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

  1. जि.एन.एम. प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली – 140,
  2. प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्ली – 20
  3. उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथील आंतररुग्ण विभाग – 20
  4. उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथील आंतररुग्ण विभाग – 20

जिल्हा स्तरावरील कोविड१९ (DCH) करीता रुग्णालय

  1. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली- २०० खाटा

सदर संस्थेमध्ये कोविड-१९ चे संशयीत किंवा तापाचे रुग्ण प्राथमिक स्तरावर तपासणी व दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच मध्यम स्वरूपाचे गंभिर रुग्ण उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी व उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा तसेच नव्याने बांधकाम करण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्ली ता. अहेरी येथे विभक्त केलेले २० खाटांचे सी.एच.सी. मध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा समान्य रुग्णालयस्तरावर सुध्दा विभक्त २०० खाटांचे कोविड-19. रुग्णालय तयार करण्यात आले आहे. नॉन कोविड रुग्णालयामध्ये जिल्हयातील सर्व  उपकेंद्रे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच सर्व ग्रामिण रुग्णालय व विभक्त केलेले उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी, कुरखेडा व संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय, अहेरी अश्याप्रकारे आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा माता बाल संगोपण रुग्णालय, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळयाचे रुग्णालय, राष्ट्रीय अंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष व रुग्णालयाच्या आवारातील धर्मशाळा यांचा नॉन कोविड रुग्णालयामध्ये समावेश आहे.

 नॉन कोविड रुग्णालयाचे नावे पुढील  प्रमाणे आहे.

1) सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे डोळयांचा दवाखाना, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष, सा.रु. गडचिरोली येथील धर्मशाळा.

2) उपजिल्हा रुग्णालय, अहेरी,

3) उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथील आंतरुग्ण विभाग सोडून,

4) उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथील आंतरुग्ण विभाग सोडून.

5) ग्रामिण रुग्णालय, सर्व,

6) प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व

7) उपकेंद्र सर्व

8) सर्व प्राथमिक आरोग्य पथक

कोविड-19 रुग्णालयात ताप, सारी (SARI)  व ILI (Influenza Like Illness) रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नॉन कोविड रुग्णालयामध्ये अन्य किरकोळ आजार, प्रजनन व बाल आरोग्य लसीकरण, असंसर्गजन्य रोग नियंत्रण व अन्य आजाराची निदान व चिकित्सा होणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.