29.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ कुरखेड्यात वादळामुळे बीएसएनएल टॉवर कोसळला

कुरखेड्यात वादळामुळे बीएसएनएल टॉवर कोसळला

0
1236

कुरखेडा,दि.28:तालुक्यात सोमवारच्या संध्याकाळी जिल्ह्याच्या काही भागात वादळाने थैमान घातले. कुरखेडा येथील बीएसएनएलचा १०० मीटर उंचीचा टॉवर कोसळला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र अनेक ग्रामपंचायतींचे ब्रॉडबँड कनेक्शन बंद झाले आहे.संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आलेल्या वादळामुळे शहरातील आठवडी बाजाराशेजारी असलेला बीएसएनएलचा १०० मीटर उंचीचा टॉवर कोसळला. हा टॉवर बाजारवाडीतील खुल्या जागेत कोसळल्याने मोठी प्राणहानी टळली असली; तरी बीएसएनएलचे  प्रचंड नुकसान झाले आहे. टॉवर कोसळल्याचे समजताच नागरिकांनी मात्र शारीरिक अंतराची तमा न बाळगता एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

या टॉवरवरून कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु आता टॉवर कोसळल्याने कनेक्टिव्हिटी बंद झाली. बीएसएनएल टॉवरसोबतच शहरातील विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गडचिरोली येथेही संध्याकाळी काही वेळ वादळ आले. काही ठिकाणी रस्त्यावर झाडेही कोसळली आहेत.