27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया आगाराला ३ कोटीचा फटका

गोंदिया आगाराला ३ कोटीचा फटका

0
327

गोंदिया,दि.30 : लॉकडाउनमुळे जीवनाश्यक वस्तू वगळता संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. यातंर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेचाही समावेश आहे. याचा फटका महामंडळाच्या बस आगारांना बसला असून गोंदिया आगाराला लॉकडाउनमुळे ३४ दिवसांत ३ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती आहे.
आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे प्रमुख साधन हे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आहे. गोंदिया व तिरोडा आगारासह शेजारील जिल्ह्यातील साकोली, भंडारा व नागपूर येथून जिल्ह्यात बससेवा दिली जाते. गोंदिया आगारातून दरदिवशी जिल्ह्यासह दूर पल्ल्यावरील ८४ बसफेर्‍या चालविल्या जातात. यातून आगाराला दररोज ११ ते ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र लॉकडावूनमुळे या सर्व बसफेर्‍या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोंदिया आगाराला लॉकडाउननंतर ३४ दिवसात जवळपास ३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख संजना पटले यांनी दिली आहे. असे असले तरी आगारातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना ७५ टक्के तर वरिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांना ५० टक्के वेतन अदा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान, पुढे आदेश मिळेपर्यंत आगारातून बससेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.