नवेगावबांध दिं.4ः कोरोणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांची हयगय होऊ नये, धान खरेदीच्या कामाला गती अधिक मिळावी. याकरता जिल्ह्यातील संपूर्ण धान्य खरेदी केंद्रावर धर्म काटे लावुन धान्य खरेदी करण्यात यावी. अशी मागणी,नवेगावबांध क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना केली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व मळणी परिसरात सध्या सुरू झालेली आहे. रब्बी हंगामातील धान पीक विक्रीसाठी तयार होत आहे. नुकतीच राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. covid-19 कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी सध्या बंद आहे. हे येथे उल्लेखनीय आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांची हयगय होऊ नये, धान खरेदीच्या कामाला गती अधिक मिळावी. याकरता जिल्ह्यातील संपूर्ण धान्य खरेदी केंद्रावर धर्म काटे लावुन धान्य खरेदी करण्यात यावी. जेणेकरून वजन माप लवकर होईल व गर्दीला नियंत्रित करण्यात येईल. खरेदी केंद्रावर धर्म काट्या च्या माध्यमातून खरेदी करण्यात यावी. अशी मागणी नवेगावबांध क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व डॉ. कादंबरी बलकवडे जिल्हाधिकारी गोंदिया यांना एका पत्राद्वारे केली आहे.





