26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ५५ प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी

५५ प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी

गोंदिया होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारातून

0
250

गोंदिया दि.१३: गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज १३ मे रोजी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात जिल्ह्यातील ५५ प्रसार माध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करण्यात आली.नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २५ मध्ये असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे.लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधी हे वृत्तसंकलन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी त्यांची देखील रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून त्यांच्यासाठी  आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य तपासणी शिबिरात  माध्यमांच्या प्रतिनिधींची थर्मल स्कॅनिंग, नाडीचे ठोके,आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. काहींना प्रतिबंधात्मक औषधे मोफत देण्यात आली.या आरोग्य तपासणी शिबिरात गोंदीया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ हर्षा कानतोडे,डॉ रोशन कानतोडे,डॉ. सुषमा गौपाले,डॉ. सपना पटले, डॉ.ग्रुरुप्रीत कौर,डॉ. ललित रहांगडाले,डॉ. आकांक्षा अग्रवाल,डॉ.साक्षी तिवारी तसेच डॉ. नेहल,डॉ.रुचिता,डॉ.रिचा  यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीची आरोग्य तपासणी केली.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक कैलाश गजभिये,धम्मपाल बोरकर,पंढरीनाथ लुटे, अमित आकरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.