गोंदिया,दि.19:- करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी राज्यात व जिल्ह्यात विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यात आतापर्यंत जिल्ह्याला यश आले असून ३८ दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नसल्यामुळेच जिल्हा आज ग्रीन झोनमध्ये आहे. पण आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेले भंडारा, गडचिरोली चंद्रपूर, वर्धा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याने ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे. ज्याप्रमाणे जिल्ह्यात बाहेरुन येणा-यांचे आवागमन सुरु आहे.आणि राजकीय दबावाखाली 7 ही दिवस बाजार खुले करण्यात येऊन गर्दीला आमंत्रण देण्यात आले. त्यामुळे ग्रीनझोन मध्ये असलेला गोंदिया जिल्हा हा ऑरेंज/रेड झोनमध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही. याकरिता उपाय म्हणून विविध मागण्या व सुचना संविधान मैत्री संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदनामार्फत केल्या आहेत. जिल्हाधिकारी याना निवेदन सादर करताना या मागण्या व सुचना करण्यात आल्या,त्यामध्ये
▪️बाजार आठवड्यातून फक्त तिन दिवस सुरु असावा, रस्त्यावर, बाजार, कार्यालय परिसरात व अन्य ठिकाणी होत असलेली बेकाबू गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी व विना मास्क फिरणा-यांवर, रस्त्त्यावर थुंकणा-यांवर, सुरक्षा उपाय न करणा-यांवर कडक कारवाई करण्यात यावे.
▪️जिथे गर्दीची ठिकाणे आहेत अशा ठिकाणी वेळेचे नियोजन असावे.व्यापारी वर्ग, लघुउद्योग कुटिरोद्योग सारखे यांना वेळ ठरवून बंधनकारक असावे.ज्यांना दुकाने उघडण्याची सवलत दिली आहे,अशानी त्यांच्या दुकानात समोर सॅनेटायझर किंवा हात धुण्याची सोय करून द्यावे. जिवनावश्यक वस्तू सोडून ज्या वस्तूंची गरज नाही, उदा. कापड, सौंदर्य प्रसाधन, बरतन इत्यादी अशी दुकानं बंद ठेवावे.
▪️ग्रामीण भागात आजही ग्रामीण प्रशासनचा सहेतुक प्रभाव कमी दिसत आहे. ग्रामीण भागातील प्रशासनावर जे बाहेरून आलेले आहेत यांची माहिती अगोदर जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचवावी. अशी शक्ती करायला हवी. त्यासाठी त्यांना केलेल्या कार्याचा अहवाल मागण्याची सूचना द्यावे. यावरून जिल्हा प्रशासनाला ग्रामीण प्रशासनाच्या जबाबदारीची जाणीव तपासता येईल.
▪️शासकीय विभागातील विविध कार्यालय, बैंकिंग क्षेत्रातील कर्मचा-यानी आम जनतेची कार्य लवकर उरकण्यासाठी गती वाढवणे गरजेचे आहे. तसे आदेश काढणे गरजेचे आहे.
▪️जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी जरी करण्यात येत असली तरी नज़रचुकिने आवागमन सुरु असल्याने जिल्ह्यात धोक्याची घंटा वाजत आहे म्हणून वेळेवर कारगर उपाययोजना व कडक निर्णय घेऊनच गोंदियाला ग्रीन ज़ोन मध्ये कायम ठेवण्यात यश येऊ शकते तसेच जिल्ह्यातील जनतेने पण प्रशासनाचे नियम काटेकोरपणे मानले पाहिजे असे प्रतिपादन संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यानी केले आहे. उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिका-यानां निवेदनपत्र सादर करतेवेळी संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक पुरुषोत्तम मोदी, समता सैनिक दल कमांडर राजहंस चौरे, ओबिसी संघर्ष कृती समिती चे कैलाश भेलावे, बहुजन युवा मंच चे सुनिल भोंगाडे, रवि भांडारकर प्रामुख्याने उपस्थीत होते.





