23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ कृषि विभाग व आत्माचा उपक्रम;शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे व खते वाटप

कृषि विभाग व आत्माचा उपक्रम;शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे व खते वाटप

0
350

गोंदिया, दि.20 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमध्ये कृषि केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होवू नये म्हणून कृषि मंत्र्यांचे आदेशावरुन शेतकऱ्यांना त्यांचे बांधावर बियाणे व खते पोहचविण्याचा उपक्रम कृषि विभाग व आत्मा यांचे संयुक्त वतीने नियोजित केलेला आहे. गोंदिया शहरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे तालुका कृषि अधिकारी व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गोंदिया यांच्या वतीने हिंदूस्थान ॲग्रो कृषि केंद्र कुडवा येथून आत्मा अंतर्गत नोंदणीकृत लक्ष्मी शेतकरी उत्पादक संघ तथा लिलावती ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चुटीया मार्फत यशोदा कंपनीचे जय श्रीराम, अहिल्या, एच.एम.टी., आय आर-64, आर.पी.-11 व 1010 जातीचे 110 बॅग धानाचे बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आले.

कृषि विभाग व आत्मामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कृषि केंद्रावर गर्दी न करता आत्मा अंतर्गत नोंदणी केलेल्या गटामार्फत खते व बियाणे आपल्या गटात मागणी नोंदवून खरेदी करावी व शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे व खते वाटप या योजनेचा लाभ घ्यावा.यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, कृषि पर्यवेक्षक श्री नंदनवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) शैलेश बिसेन, कृषि सहायक श्री दमाहे व लक्ष्मी शेतकरी उत्पादक संघ चुटियाचे सचिव रुषिकुमार टेंभरे उपस्थित होते.