सामाजिक न्यायमंत्र्याच्या जिल्ह्यात ओबीसी शिष्यवृत्तीपासून वंचित

0
9

गोंदिया दि. २३ –: जिल्ह्यातील ७ हजार ७७० हजार इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्याथ्र्याना मागील दोन वर्षातील शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या सर्व प्रवर्गातील विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यात आली असाना ओबीसी प्रवर्गातील विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. सामाजिक न्यायमत्र्यांच्या जिल्ह्यातही ओबीसींवर हा अन्याय होत आहे.विशेष म्हणजे सामाजिक न्यायमंत्र्यानी यापुर्वी केलेल्या सर्व शिष्यवृत्तीसंबधीच्या घोषणा फोल ठरु लागल्या असून फक्त अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांच्या योजनांकडेच लक्ष देण्यासाठी ते पुढे सरसावल्याचे दिसून येत आहेत.
ओबीसींच्या विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यासाठी निधीचे कारण पुढे केले जाते. सन २०१३-१४ या वर्षातील २१ हजार ७८ ओबीसी विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती सन २०१४-१५ मध्ये देण्यात आली. या विद्याथ्र्याना शिष्यवृत्तीचे आठ कोटी ३० लाख ६० हजार रूपये देण्यात आले. सन २०१४-१५ या वर्षात ओबीसी वर्गातील १३ हजार ४६६ विद्याथ्र्यांना ९ कोटी आठ लाख रूपये शिष्यवृत्ती देण्यात आली. या वर्षातील ६ हजार २७० ओबीसी विद्याथ्र्यांना ८२ लाख रूपये शिष्यवृत्ती देण्यात आली नाही.
सन २०१३-१४ या वर्षात सर्वच ओबीसी विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यावेळी आधारकार्ड लिंकींग करण्याचे काम सुरू असल्यामुळेही विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. परंतु त्या वर्षीची शिष्यवृत्ती मार्च २०१४ च्या अखेरपर्यंत काढण्यात आली. उर्वरीत ६ हजार २७० विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती निघाली नाही.
सन २०१३-०१४ या वर्षातील दिड हजार विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळाली नाही त्याला कारण शाळा व विद्याथ्र्यांचा हलगर्जीपणा आहे असे समाजकल्याण विभागाचे म्हणणे आहे.